मुंबई : विधानभवनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ, अनुभवी आमदारांसोबत यावेळी युवा आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांचा देखील समावेश होता. या शपथविधी सोहळ्यात सगळ्यांनी एकाच पद्धतीने शपथ घेतली मात्र रोहित पवारांनी घेतलेली शपथ ही हटके स्टाईलची होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शपथ घेताना सर्व आमदारांनी आपलं नाव-वडिलांच नाव- आडनाव यापद्धतीने सुरूवात केली. मात्र रोहित पवारांनी आपलं नाव 'मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार ...' असं घेतलं. शपथविधी सुरू होताच रोहित पवारांनी जी सुरूवात केली त्यामुळे सभागृहातील सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या. रोहित पवारांनी आपल्या आईच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे आपलं वेगळपण अधोरेखित केलं आहे. (रोहित पवार यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट) 


आपल्याला माहितच आहे आईचं नाव लावण्याची सुरूवात आताच्या तरूणांईने सुरू केली आहे. असं असताना आमदारकीची शपथ घेताना रोहित पवारांनी आईच्या नावाचा उल्लेख करण ही बाब कौतुकास्पद आहे. रोहित पवारांनी इतर आमदारांप्रमाणेच शपथ घेण्यास सुरूवात केली. पण त्यांचा स्वतःच्या नावाचा उल्लेख हा अनोखा होता. आपल्या नावात आईच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांची आई सुनंदा पवार यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. (सुप्रिया सुळे विधानभवनातून लगबगीने गेल्या कुठे?) 



या सोहळ्याला रोहित पवार यांची पत्नी कुंती पवार देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी,'सगळे खूष आहोत आम्ही.. आणि एकत्र आहोत...' अशी प्रतिक्रिया दिली. आपल्याला माहितच आहे रोहित पवार आणि कुंती पवार यांना दोन मुली आहेत. ('माझ्या लग्नासाठी अजितदादांनीच निभावली होती महत्त्वाची भूमिका') 


सकाळी 8 वाजता रोहित पवार विधानसभेत पोहोचले. यावेळी विधानसभेच्या प्रवेशद्वारावरच सुप्रिया सुळे या सगळ्या आमदारांच स्वागत करत होत्या. यावेळी सुप्रिया सुळेंनी खासदार आणि आत्या म्हणून रोहित पवारांना जवळ घेऊन मिठी मारली. त्यानंतर रोहित पवारांनी वाकून सुप्रिया सुळेंना नमस्कार केला. यामध्ये आत्या आणि भाच्याच प्रेम दिसून आलं.