सुप्रिया सुळे विधानभवनातून लगबगीने गेल्या कुठे?

नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी सुप्रिया सुळे विधानभवनात 

Updated: Nov 27, 2019, 12:10 PM IST
सुप्रिया सुळे विधानभवनातून लगबगीने गेल्या कुठे?  title=

मुंबई : विधानभवनावर आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. सकाळपासूनच विधानभवनावर राजकीय मंडळीची रेलचेल सुरू होती. महाराष्ट्रविकासआघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सकाळपासूनच विधानभवनावर असून चर्चेत आहेत. विधानभवनावरून सुप्रिया सुळे अगदी लगबगीने धावत जाताना दिसल्या. ही गडबड नेमकी कसली? असा प्रश्न पडतो. 

सुप्रिया सुळे सर्वात अगोदर येऊन नवनिर्वाचित आमदारांच स्वागत विधानभवनावर करत होत्या. सुप्रिया सुळेंनी सगळ्याच आमदारांनी भरपूर संघर्ष केल्याचं म्हणत त्यांना हस्तांदोलन करून स्वागत केलं. अतिशय शांत आणि आनंदी असलेल्या सुप्रिया सुळे अचानक विधानभवनाबाहेर धावत आल्या आणि कुठेतरी निघून गेल्या. (माझा दादा परत आलाय - सुप्रिया सुळे) 

असं म्हटलं जातंय की, भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. यानंतर ते विधानभवनात मुलगा आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरेंचा शपथविधी सोहळा पाहायला येतील असा अंदाज होता. मात्र आदित्य ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं म्हटलं जातंय. याकरता सुप्रिया सुळे धावत सिल्व्हर ओकला गेल्याचं म्हटलं जातंय. सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंची सिल्व्हर ओकला जाऊन भेट घेणार असल्याच म्हटलं जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं सरकार चालवणार आहे.  शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली जात होती. मात्र गेल्या 32 दिवसांत राजकीय घडामोडी पाहता नेमकं काय होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र आता अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 5 वाजता शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.