मुंबई : कंगना राणौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. कंगना राणौतच्या मुंबईमध्ये येण्याला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र कंगनाला पाठिंबा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना राणावतला तिचे मत मांडण्याचा आणि  मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना राणावत ला आरपीआय संरक्षण देईल', असं रामदास आठवले म्हणाले आहेत.



संजय राऊत यांनी मला पुन्हा मुंबईत येऊ नको अशी धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते. आता मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असा सवाल कंगनाने उपस्थित केला. यावरुन कंगनावर बॉलीवूड, मराठी इंडस्ट्री आणि राजकीय नेत्यांपासून सगळ्यांनी टीका केली. 


काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनाला जाहीर आव्हान


दरम्यान कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे. 


'मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला'