मुंबई: डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सोमवारी बघयाला मिळाली. आजही ही घसरण (मंगळवार, १४ ऑगस्ट) सुरूच  राहण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी एक डॉलरचा भाव ६९ रुपये ६२ पैसे नोंदवण्यात आला.  या आधी २० जुलै रोजी रुपयाची  डॉलरच्या  तुलनेत ६९ रुपये १३ पैसे नोंदवण्यात आली.  हा निचांक सोमवारी  मोडला.


तुर्कस्तान आणि अमेरिकेच्या व्यापारी युद्धाचा परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्कस्तान आणि अमेरिकेच्या व्यापारी युद्धाचा परिणाम म्हणून जगभरातल्या चलनांची डॉलरच्या तुलनेत घसरण झाली. दरम्यान कालच्या घसरणी दरम्यान रिझर्व्ह बँकेनं कुठलाही हस्तक्षेप केला नाही. त्याचाच परिणाम भारतावरही बघयाला मिळाला. 


पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण


सोमवारी झालेली घसरण ही पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण ठरली. पुढच्या महिन्या भरात डॉलरचा भाव ७१च्या घरात जाण्याचा अंदाज चलन बाजारात वर्तवण्यात येत आहे.