मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसानंतर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांबद्दलच्या भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या. पावसामुळे ठिकठिकाणी अडकलेले नागरिक सुखरूप घरी पोहचावे, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिनने ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून हवामान खात्याने वर्तवलेला सतर्कतेच्या इशाऱ्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने सुरक्षित घरी पोहचा, स्वतःची काळजी घ्या, अशी पोस्ट सचिनने फेसबुक आणि ट्विटरवर शेयर केली. या प्रतिक्रियामध्ये एका नेटिझनने मुंबईतील समस्या सोडवण्यासाठी सचिनने प्रयत्न करावा, अशी भावना व्यक्त केली.


सचिनच्या या पोस्टवर एकाने लिहिले की, सचिन सर तुमच्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून तुम्ही मुंबईत निर्माण होणाऱ्या परिस्थितीबद्दल जबाबदार व्यक्तींशी चर्चा करायला हवी. दरवर्षी मुंबईकरांना या समस्येचा सामना करावा लागतो, हे खेदकारक आहे. तर दुसऱ्याने मुंबईच्या विकासावर प्रशचिन्ह उभे केले आहे. विकास झाला पण पावसाच्या पाण्याला मोकळी वाट करून देण्यास आपण अपयशी ठरलो, असे त्याने म्हटले आहे. तसंच या परिस्थितीला बिल्डर, शहरातील झोपड्पट्टी  आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 



एकूणच या सगळ्या प्रतिक्रिया सचिन किती गांभीर्याने घेतो हा वेगळा मुद्दा आहे. पण सचिनच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया या मुंबईकरांच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब आहे.