संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचल्याची चर्चा
Sanjay Raut Death Threat : शिवसेनेचे (UBT) राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि त्यांच्या आमदार भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. राऊत यांनी दावा केला होता की, मला आणि भावाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली होती.
Sanjay Raut Death Threat : काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात धमकीसत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासह आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारणार असल्याचे धमकावणाऱ्याने म्हटलं होतं. त्यानंतर आता संजय राऊत धमकीप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. संजय राऊत यांना धमकावणारा हा सुनील राऊत (Sunil Raut) यांचाच निकटवर्तीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे संजय राऊत यांनी त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा सगळा बनाव रचल्याची चर्चा सुरु आहे.
खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणामध्ये मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला कांजूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सुनील राऊत यांनीच या सर्व प्रकरणाबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांना धमकी देणारा व्यक्ती सुनील राऊत यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
संजय राऊत धमकीप्रकरणा मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. त्यानंतर आता मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचाच कार्यकर्ता असल्याचे म्हटलं जात आहे. धमकीप्रकरणातील आरोपी मयूर शिंदेचे संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे वाढीव सुरक्षेसाठी हा सगळा बनाव रचल्याचे म्हटलं जात आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यासंदर्भात ट्वीट करत मुंबई पोलिसांला सवाल विचारला आहे. संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्तीला अटक केली आहे का ?आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे. मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितेश राणेंची टीका
"हा मयूर शिंदे.. श्री 420 आणि त्याचा भाऊ मिनी 420 याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे! मीडियात वाजलेले कॉल रेकॉर्डिंग सुनील राऊत आणि मयूर शिंदे यांच्यात होते! गोलमाल गँग!," असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
काय म्हटलं होतं धमकी देणाऱ्याने?
"संजय राऊत यांनी सकाळचा भोंगा बंद करावा नाहीतर त्यांना गोळी घालेन. संजय राऊत यांना फोन उचलायला सांग ते घाबरले आहेत का? दोन्ही भावांना गोळी घालेन. दोघांना स्मशानात पाठवेन. एका महिन्याच्या आता दोघांनाही गोळी मारेन," असे धमकी देण्याऱ्याने म्हटलं होतं.