कृष्णांत पाटील, झी मीडिया, मुंबई :  शरद पवारांना यावं मातोश्रीवर लागलं अशी परिस्थिती नाही,अधूनमधून ते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. कोणत्याही प्रकारचे मतभेद सरकारमध्ये नाहीत. जशी बाहेर पावसाची रिपरिप सुरू आहे ना,तशी काही लोक बातम्यांची रिपरिप करत असतात. पवार साहेब भेटले पण इतर विषयांसाठी भेटले, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीतील सुप्त तणावाची पार्श्वभूमी होती, असंही म्हटलं जात आहे. (शरद पवार आणि राऊतांनी पुन्हा साधले अचूक टायमिंग; राजकारणात माजणार खळबळ) 


 


संजय राऊत यांनी यावेळी पोलीस बदलीवर देखील भाष्य केलं. दोन  दिवसांपूर्वी पोलीस बदलीवरून महाविकासआघाडीत काही मत-मतांतर आहे अशी चर्चा रंगली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, बदल्या या प्रशासकीय बाबी आहेत, यात राजकारण नाही. यामुळं अंतर्विरोध आहे असं कुणी समजून कुणाला आनंदाच्या उखाळ्या फुटल्या असतील तर तेही तेवढं खरं नाही. असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. 


पारनेरच्या नगरसेवकांना परत करण्याची मागणी केली असेल तर मी तुम्हाला कशाला सांगू. पारनेरचा विषय लहान आहे, स्थानिक विषय आहे. त्या घटनेचा अजित पवारांचा कसा संबंध नाही.अजित पवार अंधारात होते.ही फोडाफोडी नाही, परंतु अशा प्रकारे एकमेकांच्या लोकांना प्रवेश देताना यापुढं चर्चा व्हायला हव्यात, असंही राऊत यावेळी म्हणाले. (उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना खास निरोप, म्हणाले...)


 


कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. मुख्यमंत्री चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र केंद्राने दिलंय. त्यामुळं स्थानिक लेवलला कोण काय म्हणतंय हे मला माहिती नाही, असं म्हणत काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेला राऊतांनी चोख उत्तर दिलं आहे.मातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक



 पवारांच्या मुलाखतीतून स्फोट होतील, चटके बसतील. त्यामुळं अगोदर स्फोट तर होवू द्या. पवारांनी काही महत्वाचे मते मुलाखतीत मांडली आहेत असं सांगत राऊतांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे.