Bavankule aaditya Thackeray Controversial Photo​: शिवसेना नेते संजय राऊत यांनी फोटो शेअर केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कथित फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा संजय राऊतांन केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत बावनकुळे यांनी साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात, असे राऊतांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना? असा खोचक प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय. 




दुसरीकडे भाजप महाराष्ट्रच्या एक्स अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंचा कथित फोटो शेअर करण्यात आला आहे.



'आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा आदित्य च्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?' असे ट्विट 'भाजपा महाराष्ट्र'कडून करण्यात आले आहे.