संजय राऊत म्हणाले, `हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही`
Sanjay Raut Reaction : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News) कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय.
Shivsena MP Sanjay Raut Reaction after coming out of jail on Maharashtra Govt. : तीन महिन्यांच्या तरुंगावासातून शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची जामीनावर सुटका झाली. (Maharashtra Politics News) अखेर संजय राऊत मीडियासमोर आले. यावेळी त्यांनी कुणावरही टीका केली नाही. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतलेत. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नसतात, असेही ते म्हणाले. त्याचवेळी त्यांना सरकारबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'हो! हे सरकार घटनाबाह्य आहे, तीळमात्र शंका नाही.'
मी कुणावरही भाष्य करणार नाही - राऊत
आज संजय राऊत मीडियासमोर आले. त्यावेळी ते म्हणाले, राजकारणातील कटुता संपवली पाहिजे, फडणवीसांच्या वक्तव्याचे संजय राऊत यांनी स्वागत केले. लवकरच राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीचे त्यांनी संकेत दिली. देशाच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. ईडी, तपास यंत्रणांबद्दल मी बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतलेत. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत आहेत. असं राजकारण कधी पाहिलं नव्हतं, असे ते म्हणाले.
फडणवीसांच्या वक्तव्याचं राऊतांकडून स्वागत
जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केले आहे. राजकारणातील कटुता संपवली पाहिजे, असं काही दिवसांपूर्वीच फडणवीसांच्या वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्याबाबत राऊतांनी कौतुक केलं आहे. फडणवीसांनी काही निर्णय चांगले घेतले. ते उपमुख्यमंत्री असले तरी राज्य चालवताय, त्यामुळे त्यांची लवकरच भेट घेणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली..
शरद पवार यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. आपण पवार आणि फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. संजय राऊत आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. रुग्णालयात रुटीन चेकअप केल्यानंतर दोन्ही नेत्यांची राऊत भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. कालच संजय राऊत यांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. राऊत आणि पवारांचे स्नेह सर्वांनाच माहिती आहे. पवारांना मी भेटणार आहे, असे राऊत यांनी यावेळी सांगितले.
राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला
राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका केली होती. मला त्यांना सांगायचे आहे, सावरकरही तुरुंगात होते. लोकमान्य टिळकही होते. आणीबाणीत अनेकांना अटक केली. माझी अटक ही बेकायदेशीर होती. मी जेलमध्ये होतो. तुरुंगात मी एकांतात होतो. या एकांतातील वेळ सत्करणी लावणार आहे, असा टोला राऊत आंनी राज ठाकरे यांना लगावला.