मुंबई : देशातील मोठ्या बँका ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन सेवा सुरू करीत आहेत. डेबिट कार्डच्या फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी कॅनरा बँकेने १०,००० पेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपी आवश्यक केले आहे. एटीएममधून रोकड काढून घेताना फसवणूक होऊ नये यासाठी एसबीआयने अलीकडेच योनो सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एसबीआय ग्राहक एटीएममधून डेबिट कार्डशिवाय पैसे काढू शकतात. त्यामुळे यापुढे डेबिट कार्ड बंद करण्याची घोषणा एसबीआयने केली आहे. पैस काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.


३० मिनिटांसाठी वैध असेल व्यवहार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेवेसाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये 'योनो' अॅप आवश्यक आहे. तरच तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. बॅंकेद्वारे रोकड काढण्यासाठी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) तुमच्या फोनवर पाठविला जाईल. तो ३० मिनिटांसाठी वैध असतो. म्हणजेच प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेकडून नवीन पासवर्ड देण्यात येईल. अलिकडेच, कॅनरा बँकेने एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी सुविधा सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत याची अंमलबजावणी अन्य बँकांकडून होईल.



डेबिट कार्डपासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी


एसबीआयने योनो अॅप या सेवेद्वारे रोख रक्कम काढण्याबाबत होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. या सेवेद्वारे आपण कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढू शकता. एसबीआयचा विश्वास आहे की योनोचा वापर केल्याने डेबीट कार्डचे क्लोनिंग आणि स्कॅनिंग होण्याचा धोका टळणार आहे. आता एसबीआय बॅंक एटीएम अपग्रेड करण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च करणार आहे.



असे काम करणार योनो अॅप 


योनो (YONO) म्हणजे यू ओन्ली नीड वन. (You Only Need One) हा एक प्रकारचा बँकिंग अ‍ॅप आहे. ज्याद्वारे आपण डेबिट कार्डशिवाय रोख रक्कम काढू शकतो. आपणास योनोद्वारे कॅशे देखील काढायचे असेल तर सर्व प्रथम योनो अॅप आपल्या फोनमध्ये इंस्टॉल करणे गरजेच आवश्यक आहे. कॅशे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.



- सर्व प्रथम अ‍ॅपमध्ये योनो कॅश (YONO Cash) ही कॅटगरी निवडा.
- ते उघडल्यावर आपल्याला किती पैसे काढायचे ते प्रविष्ट करा.
- आता सहा अंकी व्यवहार पिनसाठी निवडा. एटीएममधून पैसे काढताना हा पिन आवश्यक असेल.
- तसेच आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक संदेश येईल. या व्यवहाराचा व्यवहार क्रमांक असेल.
- आता एसबीआय जवळ योनो कॅश पॉईंट एटीएमवर जा आणि एटीएममध्ये योनो कॅश निवडा.
- हे निवडल्यानंतर, तुम्हाला व्यवहार क्रमांक विचारला जाईल, तुम्हाला संदेशात व्यवहार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- आता रक्कम प्रविष्ट करा आणि योनो अॅपमध्ये निवडलेल्या सहा अंकी पिन प्रविष्ट करा. आपल्याला पिन प्रविष्ट करुन कॅशे मिळेल.


बॅंकेकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना पुढील ३० मिनिटांत पिन आणि व्यवहार क्रमांक या दोघांच्या मदतीने पैसे काढून घ्यावे लागतील. नंतर ही संख्या कार्य करणार नाही. योनो सेवेचा वापर वाढल्यामुळे बँक डेबिट कार्ड हळूहळू व्यवहारतून हद्दपार होणार आहेत.