कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं. अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर (Shiv Sena Mp Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे कीर्तीकरही शिंदे गटात (Shinde Group) सामील होणार असल्याची चर्चा सुरु होती. या सर्व चर्चेवर कीर्तीकरांनी अखेर मौन सोडलंय. (shiv sena mp gajanan kirtikar given clearification on cm eknath shinde meet at goregaon party followers program)


कीर्तीकर काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मी एकनाथ शिंदेना मतदारसंघातील कामानिमित्ताने भेटलो. शिंदे गटात जाणार या चर्चा तुम्हीच केल्या,असं कीर्तीकर यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील गोरेगाात शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळेस कीर्तीकरांनी शिंदे गटात जाण्याबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं.


"शिंदेना मी म्हटलं समिट करा. एकत्र येवू या असं मी सांगितलं. भाजप-शिवसेना युती नैसर्गिक होती. राष्ट्रवादीसोबतचा प्रयोग आता संपला आहे.  पुढीलं वाटचाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असता कामा नये अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदेशीही मी बोललो. उद्धव यांच्याशीही बोललो.  ही भांडण किती दिवस चालणार एकत्र येऊन काम करायला हवं", असंही कीर्तिकरांनी नमूद केलं.