मुंबई : Shiv Sena Crisis : आताची सर्वात मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संघर्ष सुरु असताना आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून धनुष्यबाण चिन्हही  (Dhanushya Ban) जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या धनुष्यबाण चिन्हबाबत लढाई न्यायालयात सुरु आहे. कायद्याच्या लढाईत अपयश आलं तर गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवं चिन्ह मिळेल त्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती मिळत आहे. नवं चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असेही आवाहन ठाकरे आंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे की, असं काहीही होणार आहे. न्यायालयीन लढाई सुरु आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. काही जण याबाबत अफवा पसरवत आहेत. कायद्याच्या कसोटीवर चिन्हं जात नाही. आम्ही याबाबत वारंवार बोललो आहोत, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर येत्या 11 जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र, अपात्र आमदारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार सत्तेवर आलं. शिंदे गट आणि भाजप यांच्या नव्या विधानसभाध्यक्षांनी नेमणूक करीत शिवसेनेला जोरदार शह दिला. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र सुरु केले आहे. तर आदित्य ठाकरे 'निष्ठा' यात्रा सुरु करणार आहेत.