मुंबई : 'फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही' अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केली होती. अमृता फडणवीस यांच्या बोचऱ्या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली', अशा शब्दांमध्ये अमेय घोले यांनी अमृता फडणवीसांना घणाघाणी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान,  पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!' एवढंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासाठी #आजच्याआनंदीबाई असा हॅशटॅग देखील वापरला आहे. ('फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही')


 



ट्वीटमध्ये काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस? फक्त 'ठाकरे' आडनाव असल्यामुळे कोणी 'ठाकरे' होत नाही, असा सणसणीत टोला लागवत त्यांनी पुढे म्हटलं आहे की, एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा कायम विचार केला. यासाठी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान दिले असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. या ट्विटमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला असल्याची चर्चा आहे. तर, सावरकरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमृता यांनी प्रश्न उभे केले असल्याची चर्चा आहे.