Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. एकिकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हावरून वातावरण तापलेलं असतानाच आता दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर (Shivsena) शिवसेनेची आज अतिशय महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रतोद भरत शेठ गोगावले यांनी ही बैठक बोलवल्याची माहिती मिळत आहे. 


सकाळी सकाळी साडेनऊ वाजता बाळासाहेब भवनमध्ये ही बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीला शिवसेनेचे मंत्री आणि आमदार यांची उपस्थिती असेल. बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गही काढले जाणार आहेत. विधानसभा कामकाजाविषयी चर्चा होण्यासोबतच विरोधरकांना प्रत्युत्तरानं कसं गारद करायचं याविषयी बैठकीमध्ये विचार मांडले जाणार असल्याचं कळत आहे. शिवाय व्हीपसंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.  


हेसुद्धा वाचा : Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात