Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात

Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

Updated: Feb 20, 2023, 07:08 AM IST
Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात  title=
uddhav thackeray group attacked eknath shinde shivsena and bjp over biased role from saamna editorial

Shivsena Symbol : देशाच्या राजकारणात सध्या (Maharashtra Politics) महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडीचीच चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) निर्णयानंतर शिवसेना (Shivsena) हे पक्षाचं नाव आणि मूळ चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेल्यामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यातच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आता (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गट आणि त्यांना साथ असणाऱ्या भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. 

लोकशाहीमध्ये (Democracy) अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या माध्यमं आणि पत्रकारितेचा आधार घेत (Saamana editorial) 'सामना'च्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली. 'शिवसेना' हे नाव विकत घेतल्याचा आरोप करत भाजपची कमळी आता पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत असेल अशा शब्दांत सामनातून जळजळीत टीका करण्यात आली. दुकानातून विकत घेतल्या जाणाऱ्या चणे- शेंगदाण्यांप्रमाणे शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) हे मूळ चिन्हं याबाबतचा निकाल विकत घेतल्याचा मुद्या पुन्हा एकदा सामनातून प्रखर प्रकाशात आणला गेला. संपत्तीचा सैदा करावा, तशी ठाकरेंचं अधिपत्य असणारी आणि त्यांनीच जोपासलेली शिवसेना दिल्लीदरबारी तळवे चाटणाऱ्या मिंध्यांच्या हाती गेली असं म्हणत सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जळजळीत टीका करण्यात आली. 

'अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू...'

महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शाह यांचा सहभाग पाहता त्यांच्या कृपेमुळंच शिंदे गटाकडे शिवसेनेचं चिन्हंही गेल्याचा खळबळजनक आरोप करत त्यांचा उल्लेख अग्रलेखातून 'महाराष्ट्राचे शत्रू क्रमांक एक' असा करण्यात आला आहे. शाह यांचे मनसुबे आणि त्यांच्या भूमिका पाहता त्यांना साथ असणारा प्रत्येकजण हा महाराष्ट्राचा शत्रूच असेल असं लिहित शिवबांनी घडवलेला इतिहास आठवताना इथं अफजलखान वधाचा संदर्भ देण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप

 

शिवसेना ठाकरेंचीच होती आणि यापुढंही राहील असा निर्धाराचा सूर आळवताना शिवसेनेकडून पाठवण्यात आलेल्या नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही का? असा खडा सवालही करण्यात आला. 

खानाप्रमाणं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणं हे म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचा घात करण्याजोगं आहे असं लिहित भाजपच्या या चालीला महाराष्ट्र माफ करणार नाही असं म्हणत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तोफ डागली.