ShivShakti-BhimShakti Allaince : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशीच (Shivsena Pramukh Balasaheb Thackeray Jayanti) ठाकरे गट  आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Thackeray Group-VBAg Allaince)युतीची घोषणा झाली. यानिमित्तानं शिवशक्ती-भीमशक्तीचा (ShivShakti-BhimShakti) आणखी प्रयोग राज्यात होऊ घातलाय. मात्र वंचित आघाडीचा ठाकरेंना राजकीय फायदा किती होईल, प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) नेमकी ताकद किती आहे, आंबेडकरांची साथ मिळाल्यानंतर मविआचं काय होईल हे जाणून घेणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचितचा ठाकरेंना फायदा किती? 
2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि MIMची युती झाली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला होता. लोकसभेत 7 आणि विधानसभेत 30 जागांवर वंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) फटका बसला असा आरोप आघाडीकडून तेव्हा झाला. 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 41 लाख 39 हजार मतं मिळाली होती. तर विधानसभा निवडणुकीत वंचितला 28 लाख मते मिळाली. वंचितचे उमेदवार 8 जागांवर दुसऱ्या तर 23 ठिकाणी तिसऱ्या स्थानावर होते. नांदेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या 8 मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते


हे झालं राज्याचं. मात्र मुंबईतही 2019 विधानसभा निवडणुकीत वंचितचा करिष्मा दिसून आला होता.


मुंबईत फायदा कुणाला?
वरळी विधानसभा 



सायन कोळीवाडा विधानसभा 



चेंबूर विधानसभा



मानखुर्द विधानसभा 



घाटकोपर पूर्व विधानसभा 



विक्रोळी विधानसभा 



वंचितच्या मतांची संख्या लक्षणीय
भाजपसोबत रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट आहे तर शिंदे गटासोबत जोगेंद्र कवाडे गट आहे. तरीही 2019 विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर राज्यात आणि मुंबईत दलित, ओबीसी, मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीच्या पाठिशी उभा असल्याचं वरील आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मतदारसंघनिहाय विचार केला तर वंचितच्या मतांची संख्या लक्षणीय आहे. 


मुंबई ही ठाकरेंसाठी ऑक्सिजन मानला जातो. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई आहे. त्याचवेळी राजकीयदृष्ट्या आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या आंबेडकरांसाठीही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे ठाकरे गटाला वंचित आघाडीचा आणि वंचितचा ठाकरे गटाला किती राजकीय फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..