मुंबई : काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलंय. महागाईच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यात विरोधी पक्ष अपयशी ठरला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल झी २४ तासशी बोलताना शिवसेनेनं बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. मात्र शिवसेनेनं सहभागी बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे उद्या देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येईल. काँग्रेस सरकारच्या राजवटीत कच्च्या तेलाचे भाव ११० डॉलर प्रति बॅलर होते. सध्या ही किंमत ८० डॉलर प्रति बॅलर आहे. मात्र तरीही पेट्रोलचे भाव ८९ रूपयांवर जाऊन पोहोचलेत. ग्राहकांचा खिसा कापून सरकारची तिजोरी भरली जातेय, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.


काँग्रेसच्या या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि इतर पक्षांनी पाठिंबा दिलाय. या बंदच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही तसंच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. 


पाहा काय म्हणाले संजय राऊत