COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : जेजे रूग्णालयातील निवासी डॉक्टरांपाठोपाठ आता सायन रूग्णालयातील निवासी डॉक्टरही  आजपासून संपावर जातायत. सायन रूग्णालयातील सुमारे ४५० निवासी डॉक्टरांचे आज कामबंद आंदोलनाची हाक दिलीय. दरम्यान केईएम आणि नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाण्याची शक्यता आहे  मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने इथन संपाचे हत्यार उपसलं असल्याचे बोललं जातंय..


डॉक्टरांचा संप


मुंबईत जेजे आणि सायन या दोन्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे...  जेजे हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत सकारात्मकरित्या बैठक पार पडली. डॉक्टरांच्या मागण्यांवर विचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेचे सहसंचालक प्रकाश वाकोडे यांनी दिलीय. दरम्यान निवासी डॉक्टर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपल्या काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. सुमारे चारशेहून अधिक निवासी डॉक्टर संपावर असल्याने जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, कामा रुग्णालय आणि जी.टी. रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर परिणाम झालाय. शनिवारी दोन निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर मार्डने कामबंद आंदोलन सुरु केलंय.