Sushant Singh Rajput Death : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) 14 जून 2020 रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या (Sushant Singh Rajput's death) केली. या घटनेला आता अडीच वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. पण त्याच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाही. सुशांत सिंहने (Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्या केली की हत्या करण्यात आली यावरुन दावे-प्रतिदावे सुरुच आहेत. या प्रकरणी कूपर रुग्णालयातील (Cooper Hospital) कर्माचाऱ्याने ही सुशांतची हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला होता. दरम्यान भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून यामुळे हे प्रकरण आणखीच तापण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला घेऊन जात असतानाचा दावा नितेश राणे (nitesh rane) यांनी केला आहे. तसेच सुशांतचा मृतदेह घेऊन जाणारे रूपकुमार शाह दिसत असल्याचा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.  


वाचा :  राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील 


दरम्यान सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या (Sushant Singh Rajput Death) नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थिती रूपकुमार शाह यांनी केला होता. कारण मृतदेहावर बऱ्यात जखमा होत्या, असेही शाह यांनी म्हटले आहे. रुपकुमार शाह ( rupkumar shah) हे पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थि होते, हे दाखवण्यासाठी नितेश राणे ट्विवट करत व्हिडिओ शेअर केला. 



सुशांतच्या मृत्यूवर काय होता दावा?


सुशांतचे पोस्टमॉर्टम मुंबईतील कूपर (Cooper Hospital) हॉस्पिटलमध्ये झाले. या रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमार शाह यांनी धक्कादायक खुलासा केला असून, सुशांतचा मृतदेह पाहून हे आत्महत्येचे प्रकरण आहे असे वाटले नाही. जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा आम्हाला कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी 5 मृतदेह मिळाले होते. त्यापैकी एक व्हीआयपी बॉडी होती. जेव्हा आम्ही पोस्टमॉर्टमसाठी गेलो तेव्हा आम्हाला कळले की हा मृतदेह सुशांत सिंह राजपूतचा आहे. त्याच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. मानेवर दोन-तीन खुणाही होत्या. सुशांतचे शरीर वेगळेच दिसत होते. मी माझ्या वरिष्ठांकडे गेलो आणि म्हणालो की हे आत्महत्येचे प्रकरण दिसत नाही. सुशांतच्या मानेवरची खूण फासावर लटकलेली दिसत नव्हती.


रूपकुमार शाह यांनी सांगितले होते की, त्यांच्या वरिष्ठांनी सुशांतच्या पोस्टमॉर्टमशी संबंधित ही महत्त्वाची माहिती टाळली होती. यावर नंतर बोलू, एवढेच सांगितले. रूपकुमार शाहच्या या दाव्यानंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींकडून लगेच प्रतिक्रिया आल्या. अभिनेत्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने रूपकुमारच्या सुरक्षेची मागणी केली. श्वेताने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टॅग केले.