दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील एसटी सेवा सुरु करण्यासंदर्भात परिवहन खात्याकडून शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सुरुवातीला राज्यभरातील प्रवासासाठी एसटी सेवा मोफत असेल. त्यासाठी ११ मे पासून बुकिंग सुरु होईल, असे सांगितले गेले. मात्र, काही तासांतच सरकारने घुमजाव करत हा निर्णय फिरवला. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर परिवहन मंत्र्यांनाच अंधारात ठेवून हा निर्णय परस्पर बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतून गेलेल्या ११ जणांना कोरोना, रत्नागिरीत आकडा ३२ वर


या प्रकारामुळे एसटीने गावी जाण्याची आस लावून बसलेल्या शहरांतील लोकांच्या गोंधळात आणखीनच भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचण जाणवत असलेल्या लोकांना एसटीने मोफत गावी जाता येईल म्हणून दिलासा मिळाला होता. मात्र, सरकारने घुमजाव केल्याने आता या लोकांचा हिरमोड झाला आहे. याशिवाय, लोकांनी पैसे देऊन गावी जाण्याची तयारी केली तरी सरकारी आदेश आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये तफावत आहे. सरकारी आदेशात केवळ मजूर आणि अडकलेल्या लोकांनाच गावी सोडले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, शहरातील अनेक नागरिक आता आपल्यालाही गावी जायला मिळणार या आनंदात आहेत. याबाबत सरकारने अजूनही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. 


मुंबई-आग्रा महामार्गावर परप्रांतीयांची तोबा गर्दी


राज्य सरकारचा नवा आदेश काय सांगतो?


* मोफत सेवा पूर्ण राज्यातील प्रवासासाठी नाही
* एसटी बसची मोफत सेवा केवळ खालील लोकांसाठी
१) इतर राज्यातील महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांना महाराष्ट्र आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी
२)महाराष्ट्रातील इतर राज्यात अडकलेले मजूर जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी