मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनमुळे अनेक प्रवासी मजूर मुंबईत अडकले आहेत. आपापल्या गावी पोहचण्यासाठी मजूरांची धडपड सुरु आहे. या ना त्या मार्गाने, अगदी पायी चालतही मजूरांनी आपल्या गावची वाट धरली आहे. अशा परिस्थितीत मजूरांना लालपरीचा आधार मिळाला आहे. एसटीच्या लालपरीने गेल्या १० दिवसांत राज्याच्या विविध भागातील तब्बल २ लाख १ हजार ९८८ श्रमिक, मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरुप पोहचवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मजूरांना आपल्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी एसटीचे हजारो चालक अहोरात्र मेहनत घेत आहेत. एसटीच्या चालकांनी तब्बल १५ हजार ३६७ बसेसद्वारे या मजूरांना आपल्या राज्यांच्या सीमांपर्यंत पोहचवलं आहे. मजूरांसाठी एसटीच्या इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह राज्य परिवहन विभागाचं देखील सहकार्य लाभलं आहे.


राज्याच्या विविध भागांतून श्रमिकांना घेऊन, सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करत सुरक्षितपणे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी या चालकांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. चालकांच्या या कामगिरीला एसटीच्या इतर कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची मिळालेली मोलाची साथही महत्त्वाची ठरत आहे. 


मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; २४ तासांत कोरोनाचे १५९५ नवे रुग्ण


गेली ७२ वर्ष राज्याच्या जनतेला सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या एसटीने आपलं सामाजिक भान जपत, संकटात राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध घटकांना मदत केली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यानां एसटीद्वारे जाण्या-येण्याचीही सोय करण्यात आली आहे. 


देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा; काय बंद, काय सुरु राहणार?