मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; २४ तासांत कोरोनाचे १५९५ नवे रुग्ण

मुंबईत आतापर्यंत 734 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Updated: May 17, 2020, 10:00 PM IST
मुंबईत कोरोनाचा धोका वाढला; २४ तासांत कोरोनाचे १५९५ नवे रुग्ण title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत आज सर्वाधिक वाढ झाली आहे. मुंबईत एका दिवसांत 1595 नवे करोना रुग्ण वाढले आहेत. शनिवारी मुंबईत 18 हजार 555 रुग्ण होते. मात्र आता त्यात 1595 रुग्णांची वाढ झाली असून मुंबईत एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजार 150वर पोहचला आहे. 

मुंबईत आतापर्यंत 734 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

धारावीमध्ये नवे 44 कोरोना रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता एकट्या धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1242वर पोहचला आहे. 

मुंबई उपनगर, तसंच इतर शहरांतही कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ठाणे 228 तर ठाणे मनपात 1550 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1368 वर पोहचली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेलमध्ये 206 जण कोरोनाग्रस्त असून 11 जणांचा बळी गेला आहे. उल्हासनगर मनपात कोरोना रुग्णांची संख्या 101वर गेली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 520 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 

धारावीत ४४ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या १२४२वर

मीरा-भाईंदरमध्ये 300 जण कोरोना पॉझिटिव्ह असून आतापर्यंत 4 जण दगावले आहेत. तर वसई-विरारमध्ये एकूण 359 जण कोरोनाबाधित असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आज राज्यात कोरोनाचे तब्बल 2347 रुग्ण वाढले आहेत. एका दिवसातली रुग्णवाढीची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यापैकी एकट्या मुंबईतच 1595 रुग्ण वाढले आहेत.

धक्कादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये एका दिवसात मोठी वाढ