मुंबई : Share Market Big News : पाच महिन्याच्या सर्वोच्च पातळीवरुन भारतीय शेअर बाजार (Stock Market News) कोसळण्याची चिन्ह दिसत आहेत. अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याने जागतिक बाजारांवर विपरीत परिणाम अपेक्षित आहे. मंगळवारी रात्री अमेरिकन बाजार 1300 अंकांनी कोसळले. त्याचे पडसाद आज आशियाई बाजारात दिसत आहेत. भारतीय बाजारही खाली कोसळण्यासची शक्यता आहे . निफ्टी पाच महिन्यांनंतर प्रथमच 18 हजाराच्या वर बंद झाला. आज सकाळी मात्र बाजार उघडताच मोठी पडझड अपेक्षित आहे. छोट्या गुंतवणूकदारांना धीर धरण्याचा सल्ला तज्ज्ञांचा सल्ला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पडझड झाली तर चांगले शेअर बाजारात कमी किंमतीत उपलब्ध होतील. त्याकडे दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी खरेदी करण्याची संधी म्हणून बघण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवणूक करताना दीर्घकालीन गुंतवणूकीचाच विचार करुन गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेक जण देत असतात. गेल्या साधारण दीड एक महिन्यापासून भारतीय बाजारात चांगली तेजी दिसतेय.


पण काल रात्री अमेरिकन बाजारामध्ये आलेली विक्रीच्या लाटेमुळे भारतीय गुंतवणूकदारांचा विशेषतः छोट्या गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. पण भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अमेरिकन अर्थव्यवस्थेपेक्षा चांगली आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्याची घाई करु नये असा सल्ला 'झी बिझनेस'चे संपादक अनिल सिंघवी यांनी दिला आहे. एक दोन दिवस बाजारात पडझड दिसेल, पण बाजार पुन्हा एकदा सावरेल असा विश्वास सिंघवी यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे पडझडीत चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्तात उपलब्ध झाले तर त्याकडे गुंतवणुकीची संधी म्हणून बघावे, असा तज्ज्ञांचा होरा आहे.


आज पडझडीमध्ये बँकिंग कंपन्यांच्या शेअर्सना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात वर्षभरातल्या सर्वोच्च पातळीवर असलेल्या आयसीआयसीआय बँकेसारख्या खासगी बँकेना अमेरिकन महागाईचा फटका बसेल असं चित्र आहे. त्यासोबतच आयटी कंपन्या, ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे शेअर्स देखील खाली येण्याची शक्यता आहे.