मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात बिहार राज्यातून आलेल्या पाच पोलिसांविरुद्ध मुंबईतील वांद्रा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बिहारमधील पाटणा पोलीस यांच्यात वादाची आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी आज बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये बिहार राज्यातील पाच पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील पाटणा येथे अभिनेता सुशांतसिंह याच्या वडिलांनी नोंदविलेला झिरो FIR हा कायद्या प्रमाणे मुंबई पोलिसांकडे वर्ग (हस्तातंरण) करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता  बिहार पोलिसांनी कायदा मोडून स्वतंत्रपणे नियमबाह्य तपास केला , बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप केला, दादागिरी केली केली, असा आरोप दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. 


CRPC कायद्यानुसार १२ व १३ नुसार सुशांतसिंह राजपूत याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार फक्त मुंबई पोलीस यानाच कायदाप्रमाणे आहे. बिहारच्या पोलिसांनी महाराष्ट्र राज्य याची प्रतिमा मीडियावरुन खराब करण्याचा प्रयत्न केला म्हणून बिहार राज्यातील पाटण्याचे जे पोलीस अधिकारी मुंबई येथे आले होते. त्या पाच पोलिसांविरुद्ध भादवी कलम ३५२, ३५३, १८६ नुसार गुन्हा दाखल कारावा, अशी तक्रार महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यानी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये केली.


सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नसताना बिहार पोलीस यांनी जे कृत्य केले, ते निंदनीय आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य याचे नाव मीडियामध्ये आणि देशात कलंकित करण्याचे प्रयत्न केला म्हणून बिहारमधील पाटण्यातील त्या पोलिसांना त्वरित अटक करावी, अशी मागणीही तक्रारीत केली आहे.