मुंबई : मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने चिंता वाढवल्या आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचं टेन्शनही वाढलं आहे. दुसरीकडे एका आमदाराला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईत सध्या ते उपचार घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा दिवसापासून देवेंद्र भुयार रुग्णालयात भरती आहेत. देवेंद्र भुयार यांच्या वरुड मतदारसंघात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या अशी मागणी करणारा देवेंद्र भुयार यांचा रुग्णालयातून व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.


माझी प्रकृती स्थिर असून आपणही काळजी घेण्याचं आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी नागरिकांना केले आहे. 


स्वाइन फ्लूच्या (Swine Flu) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात जुलै महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूचे 239 रुग्ण आढळले आहेत. तर 9 रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. 


2009 मध्ये स्वाईन फ्लू जगासमोर आला. H1N1 व्हायरस फ्लू या नावानेही तो ओळखला जातो. स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसन रोगाचा एक प्रकार आहे. 2009 मध्ये, या संसर्गाने जगभरातील अनेक जणांचे प्राण घेतले होते.