मुंबई : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पदवी परिक्षांचे प्रलंबित निकाल आणि जाहीर झालेल्या निकालात प्रचंड घोळ असताना, मुंबई विद्यापीठाचा परिक्षा विभाग दुसरा शनिवार असल्याने सुट्टीवर आहे.


 त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होताहेत. तर विद्यापीठाने सुरू केलेला हेल्पडेस्कही बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे समस्या घेऊन आलेले विद्यार्थी रिकाम्या हाताने घरी परतले.