Thackeray Group vs Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे शहरासाठी ठाकरे गटानं (Thackeray Group) नवी रणनीती आखलीय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं ठाणे शहरात 200 कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उपजिल्हा प्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख अशा विविध 200 नियुक्त्या ठाकरेंनी केल्यायत. शिंदेंचा ठाणे (Thane) हा बालेकिल्ला भेदण्यासाठी ठाकरे गटानं पावलं उचललीयत. ठाकरे गटानं जुन्या शिवसैनिकांसोबतच तरुण शिवसैनिकांना (Shivsainik) संधी देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला
ठाण्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेना वाढवली. आनंद दिघेंनंतर त्यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात एकहाती वर्चस्व आहे. ठाण्यातून ते गेली चार टर्म आमदार म्हणून निवडून आले आहेत. पण एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर ठाण्यात मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे ठाणे वाचवण्यासाठी शिवसेनेनं आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. 


रश्मी ठाकरे ठाण्यात जाणार
दरम्यान, रश्मी ठाकरेही (Rashmi Thackeray) उद्या ठाण्यात आनंद दिघे यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणारेत. ठाण्यातील जय अंबे मंडळाला त्या भेट देतील. स्वर्गीय आनंद दिघे यांची मानाची देवी अशी ठाण्यातील टेंभी नाका जय अंबे मंडळाची ओळख आहे. त्यांनी या देवीची स्थापना केली होती. बालेकिल्ल्यातच शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरुयत. त्याच पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे उद्या ठाण्यात येणारेत. यावेळी उद्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यताय. दरम्यान रश्मी ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे देखील टेंभी नाका जय अंबे नवरात्रौत्सवाला भेट देणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल.