मुंबई : राज्यात उडीद आणि मुगाचा दर हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उडीद आणि मुगाची खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पणन महासंघ आणि नाफेड यांनी खरेदी केंद्र सुरु करण्याची सर्व तयारी करावी त्यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दि. 3 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांनी नोंदणी सुरु करावी, असे आदेश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. 


ऊडीद आणि मूग हमी भावाने खरेदी करण्यासाठी राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातला प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कमी भावात उडीद, मुगाची बाजारात विक्री करण्याची घाई करु नये, ज्या शेतकऱ्यांना तातडीने पैशाची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दराने उडीद, मुगाची विक्री करण्यापेक्षा शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री यांनी केले आहे.