Viral Video : रस्त्यावरचं खाताना (Street Food) काळजी घ्या असं आवाहन वारंवार केलं जातं. रस्त्यावरचे पदार्थ स्वादिष्ट आणि चमचमीत वाटत असलं तरी ते आपल्या आरोग्यासाठी (Health) धोकादायक असतं. अगदी सुशिक्षित वर्गालाही रस्त्यावरचं खाण्याचा मोह आवारत नाही. उघडयावरच्या खाद्यपदार्थामुळे कावीळ, टायफॉईड, कॉलरा, अतिसार अशा विविध आजारांना आमंत्रण मिळतं. खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील पदार्थांचा दर्जा, ते पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जाणार तेल किंवा त्यासाठी वापरलं जाणारं पाणी याचा आपण कधीच विचार करत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक धक्कादायक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किळस आल्याशिवाय रहाणार नाही. मुंबईतल्या (Mumbai) एका रेल्वे स्थानकाबाहेर इडली वडा विकणाऱ्या फेरीवाल्याचा (Idali Vendor) हा व्हिडिओ आहे. हा इडलीवाला इडली वड्याच्या चटणीत टाकण्यासाठी चक्क रेल्वे स्थानकाजवळच्या शौचालयातून पाणी आणत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. इतकंच काय तर ग्राहकांना पिण्यासाठी देखील तो हेच पाणी देतो. 


एका जागृक नागरिकांचा लक्षात ही गोष्ट आली. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका सार्वजनिक शौचालयातील नळातून हा इडलीवाला आपल्या कॅनमध्ये पाणी भरत आहे. हे शौचालय अतिशय घाणेरडं असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. त्यानंतर तो कॅन घेऊन तो पुन्हा आपल्या ठेल्याजवळ जातो आणि तेच पाणी तो इडली वडा चटणीसाठी वापरतो, काही नागरिक त्याच्याकडे इडली-वडा खातानाही या व्हिडिओत दिसतायत.



हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरच खात असाल तर काळजी घ्या, अनेकदा रस्त्यावर अर्धे कच्चे किंवा पुन्हा पुन्हा गरम करुन खाद्यपदार्थ ठेवले जातात. अशा खाद्यपदार्थामध्ये विषाणूंची वाढ झपाटयाने होते. असे अर्धवट शिजलेले खाद्यपदार्थ पोटात गेल्यास अनेक तक्रारी सुरू होतात.