अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कंगना राणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली. त्यामुळे आता उद्या भाजपने कंगनाला विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पाठवल्यास नवल वाटायला नको, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, POK वर विश्वास असलेल्या आणि मुंबई पोलिसांवर अविश्वास असलेल्या कंगना राणौत व्वा रे व्वा, यांना वाय काय झेड दर्जाची सुरक्षा दिली पाहिजे. या भाजपच्या पोपट आहेत. भाजपच्या मुखातील बोलत आहेत. केंद्र सरकार अशा लोकांना वाय दर्जाची सुरक्षा देते, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे उद्या कंगना राणौत भाजपकडून विधानपरिषद किंवा राज्यसभेत गेल्या तरी नवल वाटायला नको, असे  वडेट्टीवार यांनी म्हटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री कंगना रनौतला गृहमंत्रालयाकडून Y श्रेणी संरक्षण


कंगना राणौत सधया बॉलीवूडसह महाविकासआघाडी सरकारवर सातत्याने टीका करत आहे. तसेच तिने मुंबई पोलिसांच्या विश्वासर्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. यानंतर कंगना राणाौत शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. ९ सप्टेंबरला मी मुंबईत येणार आहे. तेव्हा आपल्याला रोखून दाखवावे, असे जाहीर आव्हान तिने शिवसेनेला दिले होते.


काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान

या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा दिल्याने वातावरण अधिकच तापले आहे. कंगनाच्या संरक्षणासाठी ११ जवान तैनात असतील. यामध्ये कमांडो आणि पोलीस दलातील जवानांचा समावेश असेल.