काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 

Updated: Sep 4, 2020, 07:08 PM IST
काय वाकडं करायचंय ते करा; कंगनाचं शिवसेनेला जाहीर आव्हान title=

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा तुमच्या बापाचा नाही. त्यामुळे तुम्हाला माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे खुले आव्हानच कंगनाने शिवसेनेला दिले आहे. महाराष्ट्र हा कोणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र हा मराठ्यांची मान अभिमानाने उंचावणाऱ्या लोकांचा आहे. मी निक्षून सांगते की, मी मराठा आहे. माझं काय वाकडं करायचंय ते करा, असे कंगनाने म्हटले आहे. 

'मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, मान्य नसेल त्यांनी...', संजय राऊतांनी कंगनाला सुनावलं

कंगनाने शुक्रवारी सकाळीही ट्विट करून शिवसेनेला डिवचले होते. अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, असे कंगना राणौतने म्हटले होते. 

असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट बनवला''मुस्लिमांचे वर्चस्व 

कंगनाकडून सातत्याने सुरु असलेल्या या टीकेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी शिवसेना भवनासमोर कंगना महिला शिवसैनिकांनी कंगना राणौतचा पुतळा जाळून तिचा निषेध केला. तसेच येत्या ९ तारखेला कंगनाला शिवसेना स्टाईल इंगा दाखवण्याचा चंग शिवसैनिकांनी बांधला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.