मुंबई : Sanjay Raut On Eknath Shinde Group : आमच्याच लोकांनी आम्हाला फसवले आहे. मात्र, शिंदे गटाला नव्या सरकारमध्ये धुणीभांडी करावी लागणार आहेत, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आपण महाविकास आघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री केला याचा अभिमान आहे. पण शिंदे गटाने शिवसेनेचा मुख्यमंत्री केला का, असा सवाल त्यांनी केला आहे.  त्याचवेळी आम्ही पुन्हा काम करु आणि स्वबळावर सत्तेत येऊ, असा दावा त्यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, आमच्या लोकांनीच आमचा विश्वासघात केला आहे. जे स्वत: देशद्रोही आहेत, ते उद्धव ठाकरे यांना कसे दोष देऊ शकतात. आपल्याच लोकांनी खंजीर खुपसल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे विनंती केली. म्हणून ते मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले.


'शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही'


शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेसाठी सत्ता जन्माला आली आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा नेहमीच मंत्र राहिला आहे. आम्ही पुन्हा स्वबळावर काम करु आणि सत्तेत येऊ, असे संजय राऊत म्हणाले.



दीपक केसरकर आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पीत होते. उगाच काही करणे देऊ नका आणि शिवसेनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करणार आहात? तुमचा नेता कोण आहे आदी सवाल उपस्थित केले. तुमचा मार्ग वेगळा आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. आज तुम्ही जे बोलत आहात आणि शरद पवार किंवा माझ्यावर आरोप करताहेत आणि त्यांना जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे ते सरकार पाडण्याचे आणि त्यांनी पाडलं, असे राऊत म्हणाले.


मी रोज सकाळी जय महाराष्ट्र करतो. मी नेहमीच पक्षासोबत राहणार. मी पक्षाचे काम करु नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उगाच पवार आणि मला जबाबदार धरत आहेत. काहीतरी करणे द्यायची म्हणून देत आहेत. मुख्यमंत्री त्या काळात नवीन होते पण त्यांचं नेतृत्व गुण काय आहेत ते महाराष्ट्राने पहिले आहे, असे राऊत म्हणाले.


ईडी चौकशीला जाणार - राऊत


उद्या आपण ईडी चौकशीला जाणार आहोत आणि कोणत्याही कारवाईला आपण सामोरं जाण्यास तयार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय.  पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना दुसरे समन्स पाठवून 1 जुलै रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.