मुंबई : फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणं अहमदनगर जिल्ह्यातील आबासाहेब भोये महागात पडली आहे. सिल्व्हाना लिडियन या महिलेशी मैत्री झाली होती. काही दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिल्यावर सिल्व्हाना या महिलेने पीडित तक्रारदार आबासाहेब यांना तिचे काही पार्सल मुंबई विमानतळावर कस्टममध्ये अडकून पडले असून ते सोडविण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवून पीडित तक्रादार यांनी या महिलेला बऱ्याच वेळा तिने दिलेल्या अकाउंटमध्ये साडे आठ लाख रुपये टप्याटप्याने दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित इसमाने बऱ्याच वेळा पैसे परत करण्याची मागणी करूनही सदर महिलेकडून उत्तर न मिळत असल्याने तक्रारदार आबासाहेब यांनी ई-मेल करून पैशांची मागणी केली. यावर संबंधित महिलेने आपला युकेमधील तिचा एक माणूस मुंबईत येऊन पैसे देईल असे सांगितले. ठरल्याप्रमाणे आबासाहेब यांना ओरफॉ युले (35) याने फोन करून मुंबईत भेटण्यासाठी बोलाविले होते. 


पोलिसांनी यावेळी सापळा रचून या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर ही सर्व टोळी नायजेरियन असल्याचे पुढे आले आहे. आणखी कोणत्या व्यक्तींची अशा प्रकारे फसवणूक केली याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.