मुंबई: प्रत्येक जण हा स्वत:च्या तब्येतीबाबत जागरुक असतोच, आणि व्यक्ती जास्तच जाड असेल तर डाएट फॉलो करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही जण तर फक्त फॅशन म्हणून वजन कमी करण्यासाठी उपाशी राहतात. तर काही जण फिट राहण्यासाठी औषधांचाही वापर करतात. पण केळं खाऊनही तुम्ही आपलं वजन कमी करु शकता. 


केळं खाल्यामुळे वजन वाढतं हा बहुतेक जणांचा समज आहे. पण रोज सकाळी केळं आणि एक कप गरम पाणी प्यायलं तर तुमचं वजन कमी होईल, एवढंच नाही तर तुमचं शरीरही सुडौल होईल. 


केळं मेटाबॉलिजम वाढवायला मदत करतं, तसंच पचन शक्तीही वाढते.  केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टार्च असतात. तसंच केळ्यामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्टाच्या त्रासापासून मुक्ती मिळते. 


केळ्याबरोबर गरम पाणी प्यायल्यामुळे पचन शक्ती वाढते. गरम पाणी शक्तीवर्धक आहे. गरम पाण्यामुळे शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. केळ्याबरोबर गरम पाणी प्यायल्यामुळे कॅलरी आणि शुगर न वाढवता तुम्हाला एनर्जी मिळू शकते.