सांधेदुखीवर गुणकारी औषध
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सांधेदुखीची समस्या सामान्य झालीये. जॉईंट कार्टिज संपल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे चिकित्सक सांगतात.
मुंबई : सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे सांधेदुखीची समस्या सामान्य झालीये. जॉईंट कार्टिज संपल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे चिकित्सक सांगतात. यावेळी जॉईंट रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. मात्र आता त्याची गरज नाही. सांधेदुखीवर लाला लजपतराय मेमोरियम मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी औषध शोधून काढलेय.
याआधी या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. उंदरावर हा प्रयोग सफल झाला. त्यानंतर आता सांधेदुखीच्या पेशंटवर उपचारासाठी हे औषध वापरले जातेय. या औषधसाठी दररोज १० ते १५ रुपयांचा खर्च येतो. ८० टक्क्यांहून अधिक केसेमध्ये या औषधाचा परिणाम दिसून आलाय. या औषधाला मेडिकल सायन्सशी संबंधित अनेक संस्थांनी मान्यता दिलीये.
संशोधनादरम्यान कोलेजन -२ पेपेटाईड आणि डायेरिन या औषधांचा शोध लावण्यात आला. ही दोन्ही औषधे सहा महिने नियमितपणे सेवन केल्यानंतर हाडांना जोडणारे जॉईंट कार्टिज तयार झाले. या औषधामुळे ८० टक्के पेशंटना जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडली नाही.