दाढी करण्यापूर्वी लिंबूचा उपाय, चेहऱ्यावर जादुई परिणाम
सतत दाढी करून पुरूषांच्या चेहऱ्याची स्किन खडबडीत होते. कालानुरूप चेहऱ्यावर कठोरपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण लिंबूचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा स्मूथ आणि कायम तरूण दिसू लागते.
मुंबई : सतत दाढी करून पुरूषांच्या चेहऱ्याची स्किन खडबडीत होते. कालानुरूप चेहऱ्यावर कठोरपणा आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण लिंबूचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा स्मूथ आणि कायम तरूण दिसू लागते.
लिंबूचे अनेक गुण आहे, त्यामुळे सेलिब्रिटी चोरी-चोरी लिंबूचा वापर करतात.
आता तुम्हांलाही आम्ही हे सिक्रेट सांगणार आहोत.
१) शेविंगच्या पाच मिनिटांपूर्वी आपल्या गालांना आणि ज्या भागात शेविंग करतो चेहऱ्याच्या त्या भागाला लिंबूचा रस लावा. त्यानंतर हातात थोडे पाणी घेऊन हलक्या हातांनी मालिश करा.
२) काही मिनिटात तुम्हांला चेहऱ्याची स्किन स्मूथ झालेली वाटेल. त्यापूर्वी चेहऱ्याला साध्या पाण्याने विना साबणाने धुऊन घ्या. काळजी घ्या चेहऱ्याला टॉवेल किंवा कोणत्याही कापडाने जोरात पुसू नका.
३) आता शेविंग करा. शेविंग करताना योग्य दिशेने केली पाहिजे. स्किनला जास्त जोरात रगडून शेविंग करू नका. तुम्हांला लक्षात येईल की लिंबूचा वापर केल्याने तुमची स्किन खूप स्मूथ होईल.
४) प्रत्येकवेळी तुम्ही शेविंग करण्यापूर्वी हा उपाय करू शकतात. यामुळे तुमचा चेहरा खडबडीत किंवा रफ होत नाही.