मुंबई : लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. 


- कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. 


- रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा. कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे.  लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. 


- लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.


- लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे.  


- पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते.  हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. 


- लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हृदयाची स्पंदनेही नियंत्रित ठेवण्यास या पोटॅशियमचा उपयोग होतो. 


- लसणात असलेले ‘क’ जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व व जस्त यांचा रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्यास उपयोग होतो. 


- लसणात अ‍ॅलिसिन नावाचे औषधी तत्त्व असते. त्यामुळे बुरशीचा संसर्ग, जीवाणू, विषाणू संसर्ग बरे होण्यास मदत होते.