कपिल राऊत, ठाणे : तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...


निद्रा विकार धोकायदायक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोपेत घोरणारी व्यक्ती बघितली की, किती शांत झोपलाय अशी सहज प्रतिक्रिया येते. मात्र, ही शांत झोप नसून ती काळ झोप असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हे घोरणं आरोग्याला घातक आहे. झोपेत घोरत असताना, घोरणाऱ्या व्यक्तीचे कंठ बंद होवून शरिराला ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीला डायबेटीस, ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक  यांसारखे आजार जडू शकतात, असं निद्रा विकार तज्ज्ञ डॉ. अभिजित देशपांडे यांनी म्हटलंय. 


तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. बदलत्या जीवनशैलीमुळे आज घोरण्याचं प्रमाण वाढत आहे. 


प्रत्येक मणुष्य आपल्या आयुष्याचा एक तृतीअंश भाग झोपेत घालवतो. अशातच बदललेल्या जीवन शैलीमुळे गेल्या चार दशकात निद्रा नाशाचं प्रमाण वाढले आहे. पुरेशा झोपेअभावी अनेकांना शारीरिक व्याधी जडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करुन सकाळी लवकर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरेशी झोप होत नाही. त्याचेही दुष्परीणाम आता समोर आले आहेत. निद्रा नाश, अपुरी झोप हे अनेक रोगांना आमंत्रण देत असून त्यावर वेळीच उपाय करण्याची आवश्यकता आहे.