दुपारी तीननंतर कॉफी पिऊ नका...जाणून घ्या यामागची कारणे
तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मुंबई : तुम्हाला ऑफिसमध्ये दुपारी तीननंतर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
जेवल्यानंतर ऑफिसमध्ये काम करताना झोप येते त्यामुळे अनेकांना तीननंतर कॉफी घेण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
तीननंतर कॉफी घेतल्यास याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो. दुपारनंतर उशिरा कॉफी प्यायल्यास मेलॅटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीवर परिणाम होतो. मेलॅटोनिन हार्मोन्समुळे आपल्या शरीराला झोपेबद्दलचे संकेत मिळतात.
जे लोक दुपारी तीन नंतर कॉफी पिणे पसंत करतात ते केवळ पाच ते साडेपाच तास झोपतात. याउलट कॉफी न घेणारे लोक सात तासांची पुरेशी झोप घेतात.