तन्गर : अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात दरड कोसळून १६ मजूर ठार झालेत. तवांगपासून जवळ असलेल्या फामला गावात आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NDRFनं घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून १६ मृतदेह काढण्यात आले असून बचावकार्य पूर्ण झालेय. मृत्युमुखी पडलेले सर्वजण तिथल्या एका हॉटेलच्या बांधकामासाठी बाजूच्या राज्यांमधून आलेले मजूर असल्याचं समजतंय.


घटनास्थळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अरूणाचलचे मुख्यमंत्री कालिखो पूल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ही घटना दुःखदायक असल्याचं म्हटलंय. 


अतिरिक्त उपायुक्त लोड गांबो यांनी सांगितले की, शहरापासून चार किलोमीटर बांधकाम सुरू होते. तेथे १७ कामगार काम करत होते. भूस्खलनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. नऊ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.


दरम्यान, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असून, विविध ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.