आधार आणि पॅनवरील नावाचे स्पेलिंग चुकले तर टेन्शन नाही
तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
नवी दिल्ली : तुमच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग वेगवेगळे असेल तर तुम्हांला घाबरण्याचे कारण नाही. ज्यांचा नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधार कार्डाशी जुळत नसेल त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे.
तुमच्या नावाचे स्पेलिंग पॅन आणि आधारवर वेगवेगळे असेल तरीही तुम्ही ते एकमेकांना लिंक करू शकतात. केंद्र सरकारच्या आदेशानुसार पॅनकार्डवरील नाव बदलण्यासाठी अनेकांची अर्ज केले. एक जुलै पूर्वी या दोन्ही ठिकाणी एक नाव असण्याचा दबाव सामान्यांप्रमाणे संबंधित विभागांवर आहे.
पॅनकार्ड आधारला जोडण्याची पद्धत...
https://incometaxindiaefiling.gov.in/ ही वेबसाइट ओपन करा. त्यावर लॉन इन हिअर वर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही लॉगिंन पेजवर जाल.
लॉग इन डिटेल मागणाऱ्या या पेजमध्ये टॉप नेव्हिगेशनवर सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला आधार (Link Aadhaar) ऑप्शन दिसणार आहे.
त्यानंतर जे पेज उघडणार त्यात PAN आणि Aadhaar नंबरचे कॉलम येतील त्यात Name As Per AADHAAR या कॉलममध्ये आधारकार्डावर जसे नाव दिले ते टाइप करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. लिंक Link Aadhaar वर जाऊन सब्मिट करा.