जयपूर : भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.  हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून प्रथम १२ शहरांत ८० वाहनांच्या माध्यमातून नाश्ता आणि जेवण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ५ रुपयांत नाश्ता आणि ८ रुपयांत पौष्टीक जेवण उपलब्ध करुन दिले जात आहे.


जयपूर शहरात २५ वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश रिक्षावाले, ऑटोवाले, ठेलेवाले, कर्मचारी, विद्यार्थी आणि महिला यांना चांगले जेवण मिळावे हा आहे.


अशी योजना आहे - 


नाश्ता : सकाळी ८ ते सकाली १०.३० वाजता 
लंच : सकाळी ११.३० ते दुपारी २.३० वाजता   
डिनर : संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० वाजता 


या शहात अशी वाहने असतील


जयपूर------------२५
जोधपूर-----------०५
कोटा-------------१०
अजमेर------------०५
बीकानेर------------०५
उदयपूर-------------०५
भरतपूर-------------०५
बारां----------------०३
बांसवाड़ा-------------०४
डूंगरपुर-----------०४
प्रतापगढ़----------०३
झालावाड़---------०६