नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे राज्यातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांना अखेर शनिवारी मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. खडसे गेल्या काही दिवसांपासून विविध आरोपांच्या गर्तेत सापडले होते, आता या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 


खडसे यांनी शनिवारी सकाळी राजीनामा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो मंजुरीसाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठविला आणि रात्री उशिरा तो स्वीकारण्यात आला. खडसेंवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होणार आहे.


आरक्षणाच्या मागणीसाठी गुजरातमधील पटेल समुदायाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पटेलचाही केजरीवाल यांनी संदर्भ दिला आहे. 'गुजरात सरकारने हार्दिक पटेलविरुद्धचा देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्यावा. त्याने देशद्रोह केलेला नाही. खडसेंनी केला आहे. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करा', असे केजरीवाल यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.