आसाममध्ये ६ लाख लोकांना पूराचा फटका
आसाममध्ये आलेल्या महापूरानं जनजीवन विस्कळीत झालंय.14 जिल्ह्यांमधील सहा लाखांहून अधिक नागरीकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या मतदीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवनांना तैनात करण्यात आलं आहे.
आसाम : आसाममध्ये आलेल्या महापूरानं जनजीवन विस्कळीत झालंय.14 जिल्ह्यांमधील सहा लाखांहून अधिक नागरीकांना या पूराचा फटका बसला आहे. पूरग्रस्तांच्या मतदीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या जवनांना तैनात करण्यात आलं आहे.
पूरग्रस्तांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी 81 ठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. लखीमपूर, गोलाघाट, मोरीगाव, जोरहाट, धीमाजी,सिवसागर, कोकराझार, बारपेटा या भागाला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील घरं, आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नूकसान झालंय. शिवाय काझीरंगा नॅशनलपार्कमधील काही भागालाही पूराचा विळखा पडलय.. या पूरामुळे अभयारण्यातील वन्यजीवन मोठ्या प्रमाणावर बाधीत झालंय. काझीरंगातील सखल भाग पूराच्या पाण्याखाली गेलाय त्यामुळे अभयारण्यातील हत्ती, गेंडे जीव वाचवण्यासाठी उंच भागाकडे पळू लागलेत.