नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आणि सपाचे नेते आझम खान हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आझम खान यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामध्ये भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो, पण याला तुम्ही लव्ह जिहाद समजू नका, असं आझम खान म्हणाले आहेत. तसंच या जेवढ्याची लग्न झाली नाहीत त्यांची लग्न लावून टाका म्हणजे त्यांचं फ्रस्ट्रेशन संपेल, असंही आझम खान म्हणाले. 


आझम खान यांच्या या वक्तव्यावर भाजपनं टीका केली आहे. आझम खान हे मानसिक विकृत आहेत, अशी प्रतिक्रिया कैलास विजयवर्गीय यांनी दिली आहे.