नवी दिल्ली : राहुल गांधी यांचं शीर कापून आणणाऱ्याचं मंदिर उभारू, अशी खळबळजनक घोषणा एका भाजप नेत्यानं केलीय. यामुळे, सर्व स्तरांतून भाजपवर टीका होतेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या जगतार सिंह बाजवा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. 


देशाचे तुकडे करणाऱ्यांना साथ देणारे राहुल गांधीही देशद्रोही असल्याचं सांगत, जो काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं शीर कापून जेएनयूच्या गेटवर लावील, त्या व्यक्तीचं मंदिर उभारलं जाईल, अशी घोषणाच मीडियासमोर केली. 


बाजवा यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १५३ बी, ५०४ नुसार तक्रार दाखल केलीय.