जयपूर :  राजस्थानची राजधानी जयपूर जिल्ह्यातील कोटपुतलीच्या एका गावात आपल्या हादरविणार व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ येथील रामपुरा गावातील असल्याचे बोलले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
 या व्हिडिओमध्ये एका लग्नासाठी हुंडा म्हणून नवरदेवासाठी १ कोटी ५१ हजार लाखांची बोली लावण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. बोली लावण्यासाठी एक लाखांच्या नोटांच्या गड्डीचा वापर करण्यात आला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
 अशा प्रकारे पैसा राजस्थानातील गुर्जर समाजात पैरावणी म्हणजे नातेवाईकांचा मान म्हणून दिला जातो. गावातील लोकांचा दावा आहे की, ५ एप्रिलला कोटपुतली रामपुरा गावातील लीलाराम गुर्जर यांच्या मुलीच्या लग्नात गाव आणि समाजातील पंचांसमोर हुंडा देण्यात आला. 



 
  हा हुंडा सहा मुलींचा एकूण हुंडा देण्यात आला की एका मुलीसाठी देण्यात आला, पण हे अजून स्पष्ट झाले नाही. यातील सहा मुलींपैकी चार या अल्पवयीन आहेत. 


दरम्यान, अशी काही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मी व्हिडिओ पाहिला नाही. पाहून यावर उत्तर देऊ शकतो असे कोटपुतलीचे एसडीएम सुरेश चौधरी यांनी सांगितले.