श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील आंदोलनात बुरहान वनीचे वडिलही सहभागी झाले आहेत, नवा चेहरा बनलेल्या हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनीचे वडील मुजफ्फर वनी यांनी फुटीरतावाद्यांपेक्षाही जास्त कहर करणारे पाऊल टाकले आहे. मुजफ्फर वनी यांनी नुकताच पॅंपोर येथे हजारो आंदोलनकर्त्यांसह मोर्चा काढला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी 'दरगाह चलो'चे आवाहन फुटीरतावाद्यांच्या गटाने केले होते, यात सैयद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारुख आणि जेकेएलएफचे यासीन मलिक आदींचा समावेश आहे.   परंतु त्याचा प्रभाव जास्त जाणवला नाही. मात्र, वनीच्या वडिलांनी सहभाग घेतलेल्या आंदोलनामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. 


प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अनेक लोक चालत मुझ्झफर वनींच्या मोर्चात सहभागी झाले होते, तर वनी खुद्द एका वाहनातून तिथे आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत गाडीमध्ये हत्यारबंद दहशतवादी बसले होते. ही घटना २०१० सालची होती. 


मुझफ्फर वनी यांनी आंदोलनकर्त्यांना आपली दोन्ही मुले काश्‍मीरसाठी कुर्बान केल्यानंतर या लढ्यात मुलीला सहभागी करत असल्याचे सांगितले. बुरहानचा भाऊ खालिद २०१० मध्ये त्राल येथे जवानांसोबतच्या चकमकींमध्ये मारला गेला होता.