उद्यपूर : राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात एका महिलेने तीन पाय असलेल्या मुलीला जन्म दिलाय. विशेष म्हणजे ती महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. उपखंडाच्या भगोरा गावातील निवासी रोशनी कटारा यांना गुरुवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र नवजात बाळाला पाहून डॉक्टरही हैराण झाले. या बाळाला दोन पाय सामान्य आहेत मात्र तिसरा पाय पाठीच्या कण्याला आहे. यानंतर तेथील डॉक्टरांनी तातडीने महिला आणि बाळआला बांसवाडा येथील रुग्णालयात दाखल कऱण्यास सांगितले. 


दरम्यान, जेव्हा आठव्या महिन्यात रोशनी यांची सोनोग्राफी कऱण्यात आली होती त्यावेळी बाळाचा हा तिसरा पाय रिपोर्टमध्ये दिसला नव्हता. हे पहिलेच प्रकरण आहे.  गर्भधारणेदरम्यान अंडाशयच्या विकासात काही कमतरता असं होऊ शकत अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र मालव यांनी दिली.