नवी दिल्ली : हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चीनने भारताला इशारा दिला आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पा़डण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, हे राजकीय फायद्यासाठी असून चुकीचं  पाऊल असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाने चीनच्या या भूमिकेविषयी बातमीत म्हटलंय, संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानातील दहशतवादी गटाचा म्होरक्या 'मसूद अझहर'वर प्रतिबंधात्मक कारवाईविरोधात, चीनचं हे उत्तर असल्याचं म्हटलं जात आहे. चीनने यावर असंही म्हटलंय की, काऊंटर दहशतवादाच्या नावाखाली भारत राजकीय फायदा घेतोय.


पाकिस्तानसाठी चीनने भारतविरोधी वल्गना करण्यास सुरूवात केली आहे, त्या विरोधात भारतातील सामान्य नागरिकांनाही सोशल मीडियात चीनी वस्तू न वापरण्याचा निश्चय केला आहे.